Pages

Ads 468x60px

Featured Posts

Online Typing Work

आजच्या या स्पर्धेच्या युगात कामाचा वेग वाढतच आहे. आज गल्ली ते दिल्ली आणि शाळा, कॉलेज ते ऑफिस पर्यंत टायपिंगच्या कामांना वेग आला आहे. मग ते शाळा ,कॉलेजचे Projects असो वा ऑफिस मधील काम असो ! पण हे सर्व काम आपण स्वतः करू शकत नाही किंबहुना तितका वेळ आपल्याला मिळत नाही. मग आपण झेरोक्स सेंटर किंवा टायपिंगची कामे करून देणाऱ्या एखाद्या दुकानात जातो.

Online Photo Printing

आजकाल प्रत्येकजन फोटोग्राफर झालाय ! बरोबर ना ? अहो कसं काय म्हणून काय विचारताय तुमच्या फोनची Gallery उघडून पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मोबाईल, डिजिटल कॅमेरा इ. द्वारे आपण अनेक आठवणी कैद करून घेत असतो. आयुष्यातील अनेक आठवणी साठवण्याचा प्रयत्न करत असतो. पण या कैद केलेल्या आठवणी कागदावर उतरतात तेव्हा त्याची मजा काही औरच असते.

Visiting Cards Printing

व्हिजिटिंग कार्ड्स आज काळाची गरज बनली आहे. तुम्ही व्यावसाईक असा वा नोकरदार, व्यवसाय छोटा असो वा मोठा, आता पूर्वीप्रमाणे कोणी चिठ्ठ्यांवर आपले नंबर वा पत्ता लिहून देत नाही. खिशातून व्हिजिटिंग कार्ड काढले जाते आणि दिले जाते. यामुळे वेळ वाचतोच पण त्याचबरोबर आपली आपल्या व्यवसायाची एक वेगळीच छाप पडते.